संत श्रीरामदासस्वामी यांनी लिहिलेल्या दासबोध या ग्रंथात आत्मज्ञान, भक्ती, व्यवहार, राजकारण, नीती, धर्म, शिक्षण, समाजकारण, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, तत्वज्ञान अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे ‘दासबोध’ हा ग्रंथ म्हणजे एक प्रकारचा जीवनविश्वकोशच आहे. या ग्रंथाचे वाचन, चिंतन, मनन आणि आचरण केल्याने जीवनात निश्चितपणे सकारात्मक बदल घडतो. याच ग्रंथातील निवडक ओव्यांचे लेखिका दीपाली देशपांडे यांनी ‘दासबोध दर्शन’ या पुस्तकात सोप्या भाषेत विश्लेषण केले आहे. लेखिका सौ. दीपाली हरेश देशपांडे या गेली अनेक वर्षे ‘दासबोध’ ग्रंथाचा अभ्यास करत आहेत. ‘दासबोध’ ग्रंथाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
नाव: दासबोध दर्शन
लेखिका: सौ. दीपाली हरेश देशपांडे
श्रेणी: आध्यात्मिक









Reviews
There are no reviews yet.