नवं कोरं

या पुस्तकाच्या माध्यमातून ऍड. सुनीता साबळे यांनी भारतीय कायद्यांविषयीची महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला हे कायदे समजणे गरजेचे आहे, आणि हे पुस्तक त्यासाठी मार्गदर्शक ठरते. जटिल कायद्यांच्या विषयाला ऍड. साबळे यांनी सहजसोप्या आणि रोचक शैलीत मांडले आहे, ज्यामुळे कायद्यासारखा एरवी रुक्ष वाटणारा विषयही वाचकांसाठी वाचनीय बनतो.

भारतीय कायद्यांवर आधारित असलेले हे पुस्तक सामान्य नागरिकांपासून विद्यार्थी आणि कायद्याच्या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी उपयुक्त आहे. जर तुम्हाला कायद्याची मूलभूत माहिती सहज समजून घ्यायची असेल, तर ‘कायद्याची पायरी’ नक्की वाचा!

नाव: कायद्याची पायरी
लेखक: ऍड. सुनीता साबळे
श्रेणी: माहितीपर

बेस्ट सेलर

लेखिका: प्रा. प्रज्ञा पंडित
श्रेणी: शैक्षणिक
किंमत: फक्त ५० रुपये

तुम्हाला इंग्रजी येतं!

रोजच्या आयुष्यात आपण अनेक इंग्रजी शब्द इतक्या सफाईदारपणे वापरतो की ते इंग्रजी आहेत हेच आपण विसरलेलो असतो. रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या जवळपास २०% वाक्यांचा सराव केलात तर कोणत्याही भाषेवर ८०% प्रभुत्व मिळवणे शक्य आहे. हे पुस्तक तुम्हाला त्यात मदत कारेल.

लेखिका प्रा. प्रज्ञा पंडित यांनी हे पुस्तक देशातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठी वाचकांपर्यंत पोहोचावे यासाठी खूप मेहेनत घेतली. आजवर या पुस्तकाच्या ३२ हजार हून अधिक प्रती विकल्या गेल्या आहेत. अनेक मराठी शाळांना भेट देण्यासाठी समाजातील अनेक व्यक्तींनी पुढाकार घेऊन प्रायोजकत्व दिले आहे, काहींनी स्वतः प्रती विकत घेऊन त्यांचे वाटप केलेले आहे.

बेस्ट सेलर

‘झोप एक अमृत’ या पुस्तकात लेखक अशोक पाटील यांनी हे पुस्तक झोपेच्या विज्ञानावर प्रकाश टाकला आहे. या पुस्तकातून झोप का आवश्यक आहे, झोपेचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणारे परिणाम काय आहेत आणि उत्तम झोप कशी मिळवावी याबाबत सखोल मार्गदर्शन दिलेले आहे. आरोग्यपूर्ण आणि निरोगी जीवनासाठी झोपेचे महत्व काय आहे हे त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर आपली झोप सुधारण्यासाठी काही साधे, प्रभावी उपाय हे पुस्तकात सविस्तरपणे दिले आहेत.

उत्तम आरोग्यासाठी झोपेचे महत्व समजून घ्यायचे असेल, तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

नाव: झोप एक अमृत
लेखक: अशोक पाटील
श्रेणी: माहितीपर

Shopping Cart
  • Your cart is empty.
Scroll to Top