रामाचे दिव्यत्व मान्य करताना सर्वच बाबतीत बलाढ्य असलेल्या, सोन्याची लंका निर्माण करणाऱ्या रावणाकडे आपले दुर्लक्ष झाले का? बुद्धिमत्ता, शक्ती आणि कलागुणांनी परिपूर्ण असणाऱ्या रावणाला नेहमीच आपण खलनायक म्हणून बघत आलो आहोत. रावणाच्या या खलनायकी मुखवट्यामागे दडलेला महापराक्रमी, बुद्धीवान, शिवभक्त रावणाचा चेहरा या पुस्तकातून आपल्या समोर येतो. सहजसुलभ भाषेतून घडवलेले विदारक अनुभूतींचे दर्शन, कालिक संदर्भ जागविणारे भाषारूप, भाषिक कृतींची विविधता अशा अनेक वैशिष्ट्यांसह हे पुस्तक वाचकांच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास वाटतो.
नाव: रावणायन
कवी: यामिनी पानगावकर
श्रेणी: कादंबरी
Reviews
There are no reviews yet.