माझ्याविषयी थोडंसं...
परिचय
- ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला-वाणिज्य ज्येष्ठ महाविद्यालयात मराठी भाषा विभागप्रमुख म्हणून कार्यरत.
- शारदा प्रकाशन या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नामवंत तसेच नवोदित कवी -लेखकांच्या पाचशेहून अधिक साहित्यकृतींचे प्रकाशन.
- संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड, मल्याळम आणि तेलगू भाषेत पुस्तके प्रकाशित.
- एकाच वेळी पंचवीस पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम.
- जनकवी पी. सावळाराम, साहित्यिक केशव मेश्राम, डॉ. कृ. रा. सावंत इ. सारख्या अनेक नामवंतांची पुस्तके शारदा प्रकाशनाने प्रकाशित केले आहेत.
- ठाणे महानगरपालिकेतर्फे ‘ठाणे गुणिजन’ पुरस्काराने सन्मानित.
- एकता कला अकादमीतर्फे डॉ . बाबासाहेब आंबेडकर साहित्य पुरस्काराने सन्मानित.
- सहजीवन फाऊंडेशनतर्फे ग्रंथमित्र पुरस्कार.
- नाशिकच्या के.एन. सी तर्फे साहित्य सेवा पुरस्कार.
- ‘शिक्षण संवेदन’ तर्फे “आदर्श शिक्षक पुरस्कार”
- कै. एन. एस. जे .शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे ‘सांदीपनी पुरस्कार’.
- दैनिक नवनगर मध्ये ‘मंथन’ या नावाने पुस्तक परीक्षणाचे संपादन
- विविध वृत्तपत्रात बातमीलेखन
- विविध शैक्षणिक , सांस्कृतिक , राजकीय कार्यक्रमाचे निवेदन
- विविध कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित
शारदा प्रकाशन संस्थेविषयी
शारदा प्रकाशन, ठाणे ही संस्था २५ हुन अधिक वर्षे पुस्तक प्रकाशन क्षेत्रात आहे आणि आजवर २५००० हून अधिक पुस्तके या संस्थेने प्रकाशित केली आहेत. कथा-कादंबरी असो किंवा कविता संग्रह, ललित असो की दीर्घ, धार्मिक असो की शैक्षणिक, वैचारिक असो की विनोदी… या सर्व प्रकारच्या श्रेणींमध्ये शारदा प्रकाशन या संस्थेने पुस्तके प्रकाशित केली आहेत.
नवीन आणि मुरलेल्या लेखकांना त्यांचे लिखाण प्रकाशित आणि वितरित करण्यासाठी शारदा प्रकाशन, ठाणे नेहमीच तत्पर असते. लेखकांच्या या प्रवासात आमचा या क्षेत्रातला अनुभव मोलाचा ठरतो.
एकाच वेळी 25 पुस्तके प्रकाशित
एकाच वेळी पंचवीस पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम
नामांकित आणि नवोदित साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित
नवीन आणि मुरलेल्या साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित
साहित्यिक उपक्रम
साहित्यिकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि रसिकांसाठी अनेक साहित्यिक उपक्रमांचे आयोजन
सामाजिक उपक्रम
वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचावीत, वाचन संस्कृती जपावी, वाढावी यासाठी अनेक सामाजिक उपक्रमांचे नियमित आयोजन
1986
शारदा प्रकाशन संस्थेची स्थापना
पाच वर्षांहून अधिक काळ प्रकाशन क्षेत्रात घालविल्या नंतर डॉ. प्रा. संतोष राणे यांनी शारदा प्रकाशन, ठाणे ही स्वतःची प्रकाशन संस्था स्थापन केली. १९८६ मध्ये लावलेल्या या रोपट्याचे आज एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले आहे. गेल्या २५ वर्षांमध्ये शारदा प्रकाशन या संस्थेने यशाची अनेक शिखरे पार केली.
1987
पहिलं पुस्तक
ठाण्यात पाहिलं पुस्तक प्रकाशित केलं.
1991
१००० पुस्तकांचा टप्पा गाठला
पाच वर्षांच्या अथक प्रयत्नांना घवघवीत यश मिळालं. शारदा प्रकाशनने या वर्षी १००० पुस्तके प्रकाशित करण्याचा टप्पा यशस्वीरित्या पार केला.
1995
५००० हून अधिक पुस्तके प्रकाशित
इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत, कानडी, तामिळ, तेलगू, गुजराथी आणि बंगाली या सारखा भारतातल्या अनेक भाषांमधून ५००० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली.
2021
2५००० हून अधिक पुस्तके प्रकाशित
भारतीय आणि जागतिक पातळीवर शारदा प्रकाशन चा ठसा उमटला. फक्त भारतातूनच नाही तर अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनी सारख्या देशातील भारतीयांची पुस्तके शारदा प्रकाशनने प्रकाशित केली. २५००० पुस्तके प्रकाशित करण्याचा टप्पा यशस्वीरित्या पार केला.